प्रयागराज – महाकुंभात आज चौथ्यांदा आग लागली. आगीत अनेक तंबू जळाले. आग लागल्यानंतर रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आले. परंतु गर्दीमुळे वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यास अडचण आली. त्यानंतर लोकांना घटनास्थळावरून हटवण्यात आले.
महाकुंभात 28 दिवसांत आगीची ही चौथी घटना आहे. 7 फेब्रुवारी रोजी महाकुंभ मेळा परिसरातील सेक्टर-18 मध्ये आग लागली होती. शंकराचार्य मार्गावर ही दुर्घटना घडली, ज्यामध्ये 22 मंडप जळाले होते. 19 जानेवारी रोजी सेक्टर 19 मधील गीता प्रेस कॅम्पमध्ये आग लागली होती. या अपघातात 180 कॉटेज जळून खाक झाल्या होत्या.