पिंपरी – तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे प्रवर्तक किशोर आवारे यांच्या हत्येप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मुख्य चार आरोपींना अटक केली. या रघू धोत्रे, आदेश धोत्रे, श्याम निगडकर आणि संदीप मोरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना आज वडगांव मावळातील जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.
किशोर आवारे यांच्यावर तळेगाव पालिकेच्या कार्यालयासमोर शुक्रवारी प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यात किशोर आवारे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना तात्काळ सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. किशोर आवारे यांच्या कुटुंबियांनी आमदार सुनील शेळके आणि त्यांच्या भावावर किशोर आवारे यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला.
सुनील शेळकेंनी पत्रकार परिषद घेत असा बचाव केला की, किशोर आवारे यांच्या हत्येचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. या घटनेचे आरोपी कोण, ती घटना का घडली, यामागची सत्यता काय आहे, गुन्हेगारांचा पार्श्वभूमी काय आहे? याची सखोल चौकशी पोलिसांकडून प्रामाणिकपणे सुरू आहे. मात्र, किशोर आवारे यांच्यासोबत मतभेद होते, मात्र मनभेद नक्कीच नव्हते. परंतु काही मंडळी जाणीवपूर्वक या घटनेला राजकीय वळण देत आहेत,