रायगड – जुलै महिन्यात मुसळधार पाऊस पडल्याने किल्ले रायगड परिसरात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर रायगडावर जाणारा पायी मार्ग ३१ जुलैपर्यंत बंद करण्यात आला होता. तसे आदेश रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. गेल्या चार दिवसात या परिसरात पावसाने विश्रांती घेतली आहे. या पायरी मार्गावरील महादरवाजाच्या खालील बाजूस तसेच वाळसुरे खिंडीजवळील धोकादायक असणाऱ्या भागांची दुरुस्ती करण्यात आली आहे. स्थानिक शिवभक्तांकडून या संदर्भात पायरी मार्ग सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने आजपासून किल्ले रायगडावर जाणारा नाने दरवाजा व मुख्य मार्ग शिवभक्तांसाठी खुला करण्यात आला.
किल्ले रायगडावरील पायरी मार्ग खुला
