किर्गीझस्तान
किर्गीझस्तानमध्ये गोठलेल्या धबधब्यात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. दासरी चंदू (२१) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मूळचा भारतातील हैदराबादच्या मदुगुला गावातील रहिवासी होता.गेल्या वर्षी तो एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी ककिर्गीझस्तानमध्ये गेला होता.
२१ एप्रिल रोजी दासरी चंदू हा आपल्या काही मित्रांसोबत फिरायला गेला होता. तेथील गोठून बर्फ झालेल्या धबधब्यात तो खोलवर अडकला. तिथेच त्याचा गुदमरून मृत्यू झाला. दासरी चंदू हा दासरी भीम राजू यांचा धाकटा मुलगा होता. दासरी भीम राजू यांचे अनकपल्ले शहरात मिठाईचे दुकान आहे.