Home / News / कास पठारावर रात्रीच्यावेळी वन विभागाचा जागता पहारा

कास पठारावर रात्रीच्यावेळी वन विभागाचा जागता पहारा

सातारा – जिल्ह्यातील जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावर आता वनविभागाचा रात्रीच्यावेळी जागता पहारा असणार आहे.विविध रंगाच्या फुलाची उधळण करणाऱ्या...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

सातारा – जिल्ह्यातील जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावर आता वनविभागाचा रात्रीच्यावेळी जागता पहारा असणार आहे.विविध रंगाच्या फुलाची उधळण करणाऱ्या कास पठारावर मोठ्या प्रमाणात निसर्गसंपदा आहे.तसेच विविध प्रकारचे प्राणी देखील असल्याने याठिकाणी रात्रीच्यावेळी शिकारीचे प्रकार घडत असतात.त्यामुळे यावर आता लक्ष ठेवण्यासाठी कास पठार कार्यकारी समिती आणि वन विभागाच्यावतीने रात्रगस्त घातली जात आहे.

कास पठारावर विविध प्रकारच्या मौल्यवान औषधी वनस्पती, वृक्ष आढळतात. कास पठार परिसरात एकूण २५० पाणवठे असून, साधारण जानेवारी महिन्यापासून कास पठार समितीचे कर्मचारी टँकरद्वारे पाणवठ्यांत नियमितपणे पाणी भरतात.अनेक प्राणी अन् पक्षीही कास पठार परिसरात रानगवे, रानडुक्कर,भेकर, सांबर, ससा,मुंगूस,आदी प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. कास पठार कार्यकारी समितीमध्ये आटाळी, कासाणी, पाटेघर, कुसुंबी, कास, एकीव ही गावे समाविष्ट आहेत. तसेच औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात आहेत. परिसरात विविध पशुपक्षी दिसतात. भेकर, सांबर, रानडुक्कर, ससा, रानगवे, आदी प्राणी कास पठारावर नियमित दिसतात.या प्राण्यांची शिकार करण्याचे प्रकारही वाढत चालल्याने आता वनविभागाने ही रात्रीच्या गस्तीची मोहीम हाती घेतली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या