Home / News / काश्मीरमध्ये लष्कराच्या गाडीला अपघात एका जवानाचा मृत्यू, ८ किरकोळ जखमी

काश्मीरमध्ये लष्कराच्या गाडीला अपघात एका जवानाचा मृत्यू, ८ किरकोळ जखमी

श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात गस्तीवर असलेले लष्कराचे एक वाहन उलटल्याने झालेल्या दुर्घटनेत एका जवानाचा जागीच मृत्यू झाला....

By: E-Paper Navakal

श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात गस्तीवर असलेले लष्कराचे एक वाहन उलटल्याने झालेल्या दुर्घटनेत एका जवानाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य आठ जवान जखमी झाले.कुलगामच्या दाम्हल हंजिपोरा परिसरात काल रात्री उशिरा हा अपघात झाला.या परिसरात लष्कराचे ऑपरेशन मुव्ह सुरू आहे. या मोहिमेवर असलेले वाहन वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटले.या दुर्घटनेत जखमी झालेल्या जवानांवर सरकारी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या