श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील बडगुंड येथ आज सकाळी एका मजूरावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात मजूर गंभीररित्या जखमी झाला आहे.त्याच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या ह्ल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा दिला असून शोधमोहीम हाती घेतली.शुभम कुमार (१९) असे जखमी मजुराचे नाव आहे. तो मुळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे.गेल्या आठवडाभरात बिगर -काश्मीरींवर झालेला हा तिसरा हल्ला आहे. याआधी दहशतवाद्यांनी १८ ऑक्टोबर रोजी शोपियानमध्ये तर २० ऑक्टोबर रोजी गांदरबल येथे बिगर-काश्मीरींवर हल्ले केले होते.
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी मजुराला गोळ्या घातल्या
