श्रीनगर- जम्मू काश्मीरमधील गुलमर्गजवळ लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला.या हल्ल्यात लष्कराचे २ जवान शहीद झाले, तर दोघेजण जखमी झाले. लष्करात मजूर म्हणून काम करणाऱ्या दोन नागरिकांचा मृत्यू झाला. गुलमर्गच्या नागीन भागात नियंत्रण रेषेपासून ५ किमी अंतरावर हा हल्ला झाला.
जम्मू-काश्मीरच्या गुलमर्गमध्ये भारतीय लष्कराचे वाहन नियंत्रण रेषेकडे चालले असताना दहशतवाद्यांनी या वाहनावर अंदाधुंद गोळीबार केला.या गोळीबारात तीन जवान शहीद झाले.याशिवाय दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन मजुरांचीही हत्या केली. तर अन्य दोन जवान जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सुरक्षा दलांनी हा परिसर सील करून शोधमोहीम सुरू केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या चार दिवसांत झालेला हा तिसरा मोठा हल्ला आहे. यापूर्वी २० ऑक्टोबर रोजी गांदरबलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका डॉक्टरसह ७ जणांचा मृत्यू झाला होता. गुरुवारी सकाळी एका स्थलांतरित मजुरावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या.बारामुल्ला जिल्ह्यातील बोटपाथरी येथे दहशतवाद्यांनी एका वाहनावर गोळीबार केल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले होते. याशिवाय दहशतवाद्यांनी गोळीबारात लष्कराच्या दोन पोर्टर्सचाही खात्मा केला. या दहशतवादी हल्ल्यात लष्कराचे तीन जवान जखमी झाले आहेत.हा भाग पूर्णपणे लष्कराच्या नियंत्रणाखाली असून उन्हाळ्याच्या सुरुवातीला एका दहशतवादी गटाने घुसखोरी करून अफरावत रेंजच्या उंच भागात लपून बसल्याची माहिती यापूर्वी ही मिळाली आहे.