श्रीनगर
उन्हाळ्यातही थंड राहणाऱ्या काश्मीर खोऱ्यात पहिल्यांदाच उष्णतेची लाट उसळली आहे. श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग,अमरनाथ यात्रा मार्ग तापला आहे . येथील तापमान ३२ अंश सेल्सियसवर कायम राहिले आहे. श्रीनगरचे तापमान मागील ७ दिवसांपासून ३५ अंश सेल्सियसहून जास्त आहे. काल ३५.७ अंश सेल्सियस इतके तापमान होते.
उष्णतेच्या लाटेमुळे काश्मीर खोऱ्यातील शाळांना १७ जुलैपर्यंत उन्हाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे. आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. काश्मीरमध्ये तापमानवाढीने पर्यटकांची संख्या २० टक्क्यांपर्यंत घटली आहे. गेल्या १५ दिवसांत पर्यटकांची संख्या घटल्याचे पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.