मुंबई – दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसा आणि पुरातन वास्तू असलेल्या काळा घोडा परिसरातील पाच रस्ते दर शनिवारी आणि रविवारी सायंकाळी केवळ पादचाऱ्यांसाठी खुले ठेवण्यात येणार आहेत. प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत रस्ते वाहनांसाठी बंद राहतील. या परिसराचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे.काळा घोडा परिसरात नागरिक, पर्यटक आदींची या भागात नेहमीच वर्दळ असते. पर्यटकांना हेरिटेज वॉकचा आनंद घेता यावा, येथील पुरातन वास्तू न्याहाळता याव्यात या उद्देशाने काळा घोडा परिसरातील साईबाबा मार्ग, रोप वॉक लेन, व्ही. बी. गांधी मार्ग/फोर्ब्स स्ट्रीट, रुदरफोर्ड स्ट्रीट आणि बी भरुचा मार्ग हे पाच रस्ते प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजण्याच्या दरम्यान वाहनांसाठी बंद करुन केवळ पादचाऱ्यांसाठी सुरु ठेवण्याचा आणि या संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.
काळा घोडा परिसरात वाहनांनादर शनिवार-रविवारी बंदी
