नथुराम गोडसेने जे काही केले ते योग्यच! कालीचरणांचे पुन्हा वादग्रस्त विधान

कोल्हापूर:- कालीचरण महाराज सतत वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी महात्मा गांधी आणि नथुराम गोडसेंवर भाष्य केले आहे. जेवढे नथुराम गोडसे वाचाल तेवढेल त्याचे भक्त व्हाल आणि महात्मा गांधी यांचे विरोधक व्हाल. त्यामुळे नथुराम गोडसेने जे केले ते योग्यच केले असे वादग्रस्त वक्तव्य कोल्हापूरात आलेल्या कालीचरण महाराज यांनी केले. ते पुढे म्हणाले की, नथुराम गोडसे नसते तर देशाचा नाश झाला असता. नथुराम गोडसे यांना कोटी कोटी प्रणाम आहे. कालीचरण महाराज यांच्या या विधानाचा सोशल निषेध करण्यात येत आहेत, त्यांनी माफी मागावी अशी मागणी अनेकांनी केली आहे.

महात्मा गांधींच्या संदर्भात केलेल्या विधानावर आव्हाड यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, कालीचारणची लायकी काय, त्याचे शिक्षण आहे काय ?देशातला पहिला अतिरेकी नथुराम गोडसे आहे. महात्मा गांधी बद्दल बोलणारा कालीचरण कोण? असा स्पष्ट शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी कालीचरण महाराजांवर सडकून टीका केली आहे. महात्मा गांधी यांच्याबाबत यापूर्वीही कालीचरण महाराज यांनी वादग्रस्त विधान केले होते. हरिद्वारच्या धर्मसंसदेत त्यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याप्रकरणी त्यांना अटक झाली होती. कालीचरण महाराजांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Scroll to Top