मुंबई- वडाळा मतदारसंघातील भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर हे 9 व्यापतां विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयाने त्यांनी मोठा विक्रम रचला आहे. वडाळा मतदारसंघात ठाकरे गटाकडून श्रद्धा जाधव आणि भाजपाकडून कालिदास कोळंबकर हे आमनेसामने होते.
सलग नवव्यांदा निवडणूक जिंकून माझे नाव गिनीज बुकमध्ये जाईल, असा विश्वास त्यांनी काही दिवसापूर्वी व्यक्त केला होता. कोळंबकर यांनी पहिल्यांदा शिवसेनेतून विधानसभेची निवडणूक लढवली. १९९० मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले होते . तेव्हापासून ते अपराजित आहेत. प्रथम त्यांनी नायगाव मतदारसंघातून निवडणूक लढवत विजय प्राप्त केला होता. २००९ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली. तेव्हापासून कोळंबकर वडाळा मतदारसंघातून सलग विजयी होत आहेत.