नाशिक – नांदगाव-चाळीसगाव रस्त्यावरील पिंपरखेड टोल नाका परिसरात कार आणि दुचाकीची धडक झाली. या अपघातात भाऊसाहेब व लंकाबाई माळी या दाम्पत्याचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.अपघाताची माहिती मिळताच नांदगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर नांदगाव पोलिसांनी पंचनामा केला. पोलिसांनी भाऊसाहेब माळी, लंकाबाई माळी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहे.
कार-दुचाकी अपघातात दाम्पत्याचा मृत्यू!३ जखमी
