अमरावती – मेळघाटातील परतवाडा-चिखलदरा मार्गावर असणाऱ्या मडकी गावाजवळ तेलंगणातून आलेल्या बँक अधिकाऱ्यांंची कार आज पहाटे १०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात तेलंगणतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे. दोन जण बेपत्ता असून दोघे गंभीर जखमी झाले.
तेलंगण राज्यातील सहकारी बँकेचे व्यवस्थापक असलेले सात जण कारने मेळघाटात फिरायला आले होते. परतवाडा ते चिखलदरा मार्गावर मडकी गावालगत मुसळधार पावसामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कार खोल दरीत कोसळली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी अवस्थेत आढळले. एकूण सात जणांपैकी दोन जण खोल दरीमध्ये कोसळले. जखमींना अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती अतिशय गंभीर असल्यामुळे त्यांना अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
कार दरीत कोसळून ३ बँक अधिकाऱ्यांचा मृत्यू
