Home / News / कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे थायलंडच्या पंतप्रधानांना हटवले

कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे थायलंडच्या पंतप्रधानांना हटवले

बँकॉक – थायलंडच्या मंत्रीमंडळात मंत्र्यांची नियुक्ती करताना घटनेतील तरतुदींचे आणि आदर्श तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्द्ल थायलंडचे पंतप्रधान स्रेत थविसिन यांना पंतप्रधान...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

बँकॉक – थायलंडच्या मंत्रीमंडळात मंत्र्यांची नियुक्ती करताना घटनेतील तरतुदींचे आणि आदर्श तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्द्ल थायलंडचे पंतप्रधान स्रेत थविसिन यांना पंतप्रधान पदावरुन हटवण्यात आले आहे. थायलंडच्या सर्वोच्च न्यायालयाने आज हा आदेश दिला.स्रेथ यांचे अनेक निर्णय थायलंडच्या घटनेचे व तत्त्वांचे उल्लंघन करणारे आहेत या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली. नेमक्या कोणत्या निर्णयाविरोधात ही कारावाई करण्यात आली हे न्यायालयाने स्पष्ट केले नाही. गेल्या काही दिवसांमधील त्यांचे काही निर्णय हे घटनेचे उल्लंघन करणारे होते. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका वकीलाची त्यांनी मंत्रीपदी नियुक्ती केली होती. ही नियुक्ती करतांना प्रामाणिकपणा दाखवला नाही म्हणून पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने त्यांना पदावरुन हटवण्याचा निर्णय घेतला असे न्यायमूर्ती पुन्या उडीचोन यांनी सांगितले. पंतप्रधान स्रेथ यांनी न्यायालयाचा निर्णय मान्य केला आहे. ते म्हणाले की, न्यायालय अशा प्रकारे निकाल देईल अशी मी अपेक्षा केली नव्हती. मात्र न्यायालयाच्या निकालाचा मी आदर करतो. स्रेथ गेल्या दोन वर्षांपासून थायलंडच्या पंतप्रधानपदी होते.

Web Title:
संबंधित बातम्या