कामा रुग्णालयामध्ये रील्स बनवू आणि बघू नका!

*रुग्णालय प्रशासनाचा फतवा

मुंबई- आजकाल अनेकांना रील्स बघण्याचे जणू व्यसनच जडले आहे. शासकीय कार्यालयांतही काही कर्मचारी हे रील्स पाहण्यात व्यग्र असतात. त्याला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिका मुख्यालयजवळच्या कामा रुग्णालय प्रशासनाने अधिकारी,कर्मचारी आणि सुरक्षारक्षक यांनी ऑनड्युटी असताना मोबाइलचा गैरवापर टाळावा. तसेच रील्स बनवू नये आणि बघू नयेत,असा फतवा काढला आहे.

रुग्णालयात मोबाइलचा वापर शासकीय कामासाठीच करावा.तसेच शासकीय कामकाजासाठी संदेश पाठविण्यासाठी इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅपचा वापर करावा, जेणेकरून ऑडिओ-व्हिडीओ क्लिप, फाइल्स आदी माहितीची सुरक्षित देवाण-घेवाण होईल. तसेच जे कर्मचारी कामावर असताना मोबाइलचा गैरवापर करतील त्यांच्यावर शासन नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.तुषार पालवे यांनी दिली.

नातेवाइकांनाही रुग्णालयात थांबण्यासाठी विशिष्ट जागा दिली आहे.तिथेच त्यांनी थांबणे अपेक्षित आहे.नातेवाईक दिवसभर कधीही रुग्णालयात फिरत असतात.त्यावर आता प्रतिबंध घालण्यात आला आहे.तसेच सुरक्षारक्षकांनी दर तीन तासांनी रुग्णालय परिसरात फेरी मारणे अपेक्षित आहे.फूड डिलिव्हरी कर्मचार्यांनी रुग्णालयात किंवा हॉस्टेलमध्ये न जाता रुग्णालयाच्या परिसरात ठरविलेल्या जागीच फूड पार्सल ठेवावे अशा सूचना दिल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top