काबूल -अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने काबूल येथील प्रसिद्ध सेरेना हॉटेल ताब्यात घेतले असून हे हॉटेल काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. हे हॉटेल आता तालिबान सरकारच्या हॉटेल सरकारी महामंडळाद्वारे चालवले जाणार आहे.हे हॉटेल २००५ मध्ये सुरू करण्यात आले होते. ते आगा खान फंड फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंटकडून २० वर्षांपासून चालवले जात होते. हे हॉटेल पर्यटकांमध्ये लोकप्रिय होते. पर्यटक या हॉटेलमध्ये मोठ्या संख्येने राहण्यासाठी येत असत. अफगाणिस्तानच्या हॉटेल व्यवसायाचे पुनरुज्जीवन आणि विकास करण्याचे तालिबान सरकारचे ध्येय आहे. त्यासाठी तालिबान सरकारने कठोर निर्णय घेण्याचे ठरवले आहे. तालिबान अफगाणिस्तानमधील इतर तीन हॉटेल चालवत आहे. दोन हॉटेल काबूलमध्ये आणि एक नांगरहार शहरातील आहे.
काबूलचे प्रसिद्ध सेरेना हॉटेल तालिबान सरकारच्या ताब्यात
