नांदेड – नांदेड जिल्ह्यात यंदाही कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडलेली आहे. चांगल्या बाजारभावाच्या प्रतिक्षेत अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे. सद्यस्थितीत कापूस बाजारभावात चढउतार सुरूच आहे. सध्या कापसाच्या दरात क्विंटल मागे एक हजार रूपयाची घसरण झाली आहे. काही दिवसांपूर्वी कापसाला ७ हजार ५०० रूपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. मात्र आता कापसाच्या दरात मोठी घसरण झाली असून सद्यस्थितीत जिल्ह्यात कापसाला ६ हजार ५०० रूपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. क्विंटल मागे एक हजार रूपयांची घसरण झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे.
कापसाच्या दारात एक हजाराची घसरण
