कागल साखर कारखाना निवडणुकीत मंडलिक यांची बिनविरोध निवड

कोल्हापूर- कोल्हापुरातील हमिदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक यांची कागल तालुका सहकारी साखर कारखान्यातील संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत विविध गटांसाठी 47 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यापैकी 19 जणांनी माघार घेतली असून 21 जागांपैकी 18 उमेदवार बिनविरोध झाले.
उत्पादक गट मूरगूडमधून 5 पैकी 2 उमेदवारांनी माघार घेतल्याने कारखान्याचे अध्यक्ष खासदार संजय मंडलिक, संभाजी मोरे, तुकाराम ढोले हे बिनविरोध निवडून आले. उत्पादक गट बोरवडे या गटामध्ये 7 पैकी 4 उमेदवारांनी माघार घेतल्याने आनंदा फराकटे, कृष्णा शिंदे, सत्यजित पाटील हे बिनविरोध निवडून आले. उत्पादक गट कागल या गटामध्ये 4 पैकी 1 उमेदवाराने माघार घेतल्याने धनाजी बाचणकर, शिवाजीराव इंगळे, महेश घाटगे हे बिनविरोध निवडून आले. उत्पादक गट मौजे सांगाव या गटामध्ये 6 पैकी 3 उमेदवारांनी माघार घेतल्याने कैलास जाधव, प्रकाश पाटील, मंगल तुकान हे बिनविरोध निवडून आले. उत्पादक गट कापशी सेनापती या गटामध्ये 7 पैकी 4 उमेदवारांनी माघार घेतल्याने पुंडलिक पाटील, विश्वास कुराडे, प्रदीप चव्हाण हे बिनविरोध निवडून आले. बिगर उत्पादक संस्था गट यामध्ये 2 पैकी एका उमेदवाराने माघार घेतल्याने विरेंद्र संजय मंडलिक हे बिनविरोध निवडून आले. अनुसुचित जाती व जमाती या गटामध्ये 2 पैकी एका उमेदवाराने माघार घेतल्याने चित्रगुप्त प्रभावळकर हे बिनविरोध विजयी झाले. भटक्या जाती व जमाती या गटामध्ये 2 पैकी एका उमेदवाराने माघार घेतल्याने विष्णु बुवा हे बिनविरोध निवडून आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top