पुणे – चाकण येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीतील महात्मा फुले मार्केटमध्ये आज सकाळी कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली.आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले आणि त्यांनी चाकणमध्ये सकाळी साडेअकरानंतर पुणे-नाशिक महामार्ग रोखून धरला आहे.
आज सकाळी महात्मा फुले मार्केटमध्ये कांदा लिलावाला सुरू झाली.कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याचे पाहून कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाला. त्यानंतर सर्व शेतकरी पुणे-नाशिक महामार्गावर जमले आणि सकाळी साडेअकरानंतर हा महामार्ग रोखून धरला. महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा दोन ते तीन किलोमीटर लांबपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या आंदोलनाची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि खेड तालुका प्रशासन घटनास्थळी झाले. पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यावेळी तेथे बराच वेळ गोंधळ उडाला होता.
कांद्याला कवडीमोल भाव