मुंबई- स्थानक सुधारणा कार्यक्रमांतर्गत पश्चिम रेल्वेच्या कांदिवली रेल्वे स्थानकात महत्त्वपूर्ण बदल करण्यात येत आहेत. त्यानुसार कांदिवली स्थानकातील फलाट क्रमांक ४ वर पादचारी पुलाच्या दक्षिण टोकाला असलेला सध्याचा जिना तोडण्यात येणार आहे. १ ऑक्टोबरपासून हा जिना बंद केला जाईल. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३ अ अंतर्गत कांदिवली स्थानकात प्रवाशांच्या सुविधेसाठी नवीन स्कायवॉक बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
कांदिवली स्थानकातील पुलाचा जिना बंद होणार
