कांदा, रताळी, बटाटामिरचीच्या दरात वाढ

चाकण –
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये कांदा, रताळी, बटाटा व हिरव्या मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. पालेभाज्यांची भरपूर आवक झाली. जनावरांच्या बाजारात जर्सी गाय, म्हैस व बैल यांच्या संख्येत घट झाली. एकूण उलाढाल ४ कोटी, ३० लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक १,५०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ४०० क्विंटलने वाढली. कांद्याचा कमाल भाव ५,००० रुपयांवर पोहोचला. बटाट्याची एकूण आवक २,५००क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक २७५ क्विंटलने वाढली. बटाट्याचा कमाल भाव ३,१०० रुपयांवरून ३,५०० रुपयांवर पोहोचला. लसणाची एकूण आवक ३० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक स्थिर राहिली. लसणाचा कमाल भाव २८,००० रुपयांवर स्थिरावला. हिरव्या मिरचीची एकूण आवक ३३५ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ३ हजार रुपयांपासून ते ५ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top