काँग्रेस आमदाराच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

पाटणा- काँग्रेसचे आमदार शकील अहमद खान यांचा २० वर्षीय मुलगा अयान खानने सरकारी निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. अयानने आत्महत्या का केली हे अद्याप उघड झाले नाही.

रात्री शकील अहमद खान यांच्या सरकारी निवासस्थानावर अयान एकटा खोलीत झोपला होता. सकाळी तो खोलीतून बाहेर आला नाही म्हणून कुटुंबातील एकाने खोलीत जाऊन पाहिले, तेव्हा तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.या घटनेची माहिती मिळताच पोलीस दलातील बडे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि याप्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला. अयान हा शकील अहमद खानचा एकलुता एक मुलगा होता. या घटनेची माहिती अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी एक्सवर पोस्ट करुन दिली.त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ही अतिशय दु:खद घटना आहे.बिहारमधील काँग्रेस आमदार माझे मित्र शकील अहमद खान यांच्या मुलाचे आकस्मित निधन झाले.माझ्या सहवेदना त्याच्या कुटुंबासोबत आहेत.त्याच्या आई वडिलांचे दु:ख शब्दात मांडू शकत नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top