पुणे – पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीतील इच्छुकांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू आहे. अद्याप जागा वाटपाची चर्चा सुरू झाली नसली तरी इच्छुकांनी आपापल्या पातळीवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज पुणे शहर अध्यक्ष आबा बागुल यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार यांची भेट घेतली .
आबा बागुल हे पार्वती विधानसभा मतदार संघातून इच्छुक आहेत . त्यासाठीच त्यांनी आघाडीतील नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. आज शरद पवारांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की
येत्या निवडणुकीमध्ये प्रत्येक जागा ही महाविकास आघाडीसाठी महत्त्वाची असून पर्वतीची जागा ही काँग्रेसला सोडावी अशी विनंती आम्ही पवार साहेबांकडे केली आहे.त्यावर पवार साहेबांनी निवडून येणारी सीट असेल तर नक्की याबाबत विचार करू असे आश्वासन दिल्याचे बागुल यांनी सांगितले.
काँग्रेसच्या आबा बागुलानी शरद पवारांची भेट घेतली
