Home / News / कवलापुरात अपघात महिलेसह २ चिमुकल्यांचा जागीच मृत्यू

कवलापुरात अपघात महिलेसह २ चिमुकल्यांचा जागीच मृत्यू

सांगली – कवलापूर येथे आज सकाळी १० वाजताच्या सुमारास तासगाव रस्त्यावर दुचाकी आणि प्रवासी जीप एकमेकावर धडकून भीषण अपघात झाला....

By: E-Paper Navakal

सांगली – कवलापूर येथे आज सकाळी १० वाजताच्या सुमारास तासगाव रस्त्यावर दुचाकी आणि प्रवासी जीप एकमेकावर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात आईसह २ चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहेत.अपघातानंतर जीप चालक पसार झाला.
विश्वास म्हारगुडे तळेवाडी येथील रहिवासी असून सांगलीत कुटुंबासह वास्तव्यास आहे. आज सकाळी लग्नासाठी तळेवाडी येथे ते पत्नी दिपाली म्हारगुडे, मुले सार्थक, राजकुमार यांच्यासमवेत वरून निघाले होते. कवलापूर ते कुमठे फाटा दरम्यान प्रवासी जीपने विश्वास म्हारगुडे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी जोरात होती की, दुचाकीवर वडिलांच्या पुढे बसलेला राजकुमार म्हारगुडे (५) याच्या गळ्याला पत्रा लागून तो जागीच ठार झाला. दुसरा मुलगा सार्थक म्हारगुडे (७) आणि पत्नी दिपाली म्हारगुडे (२८),यांच्या डोक्यात गंभीर मार लागून तेही जागीच मृत झाले. तर दुचाकीस्वार विश्वास म्हारगुडे यांना गंभीर दुखापत झाली असून सिव्हिल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अपघातानंतर जीप चालक नितेश नाटेकर हा पसार झाला.

Web Title:
संबंधित बातम्या