कल्याण – बारावे येथील कल्याण डोंबिवली महापालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्रात महावितरण उद्या रोहित्र दुरुस्तीचे काम करणार आहे. त्यामुळे उद्या सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत कल्याण पूर्व, पश्चिम शहरांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता राजू राठोड यांनी सांगितले.बारावे जलशुध्दीकरण केंद्राला उल्हास नदीतून पाणीपुरवठा केला जातो. बारावे जलशुध्दीकरण केंद्राला महावितरणच्या बारावे येथील वीजपुरवठा केंद्रातून वीज पुरवली जाते. या वीज केंद्रातील क्रमांक ४ व १४ क्रमांकांच्या रोहित्राची देखभाल आणि दुरुस्तीचे काम महावितरणच्या अभियंत्यांकडून केले जाणार आहे.
कल्याण शहरातील पाणी पुरवठा आज बंद
