कल्याण – कल्याण पूर्वेतील महावितरणच्या जाईबाई फिडर उच्चदाब वीज वाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम उद्या करण्यात येणार आहे.या कामासाठी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत कल्याण पूर्व भागातील जाईबाई फिडरवरून ज्या भागाला वीज पुरवठा महावितरणकडून करण्यात येतो, त्या भागाचा वीज पुरवठा बंद राहणार आहे. असे कल्याण शहर वालधुनी शाखेच्या अभियंत्यांनी सांगितले.जाईबाई फिडरवर देखभाल दुरुस्ती व उच्चदाब वीज वाहिनी दुरुस्तीचे काम उद्या सकाळी हाती घेतले जाणार आहे. कल्याण पूर्वेतील खडेगोळवली, विठ्ठलवाडी, राय पॅरेडाईज इमारत, राय निसर्ग, साई हाईट्स, तिसाई धाम, अवधाराम नगर, आत्माराम नगर, नेहरू नगर, विठ्ठल मंदिर, टाटा काॅलनी, रायगड कॉलनी परिसराचा वीजपुरवठा बंद राहणार आहे.
कल्याण पूर्वचा आज वीज पुरवठा बंद
