ठाणे – कल्याणच्या लक्ष्मी मार्केटमध्ये आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने शेतकऱ्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कल्याण पश्चिमच्या सापाड गावात बारक्या मढवी नावाचे शेतकरी कुटुंबासह राहतात. मढवी पहाटे छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील लक्ष्मी मार्केटमध्ये जनावरांना चारा घेण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर कोयत्याने सहा ते सात वार केले. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कल्याणमध्ये अज्ञाताकडून शेतकऱ्यावर कोयत्याने हल्ला
