मुंबई- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्यावर्षी ३१ डिसेंबर रोजीच्या एका आदेशाद्वारे महाराष्ट्रातील कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक आणि कर्नाटकातील बंगळुरू येथील नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक या दोन्ही बँकांच्या विलीनीकरण योजनेला परवानगी दिली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार विलीननीकरणाची ही योजना आज ५ जानेवारीपासून लागू करण्यात आली आहे. बँकिंग नियमन कायदा,१०४९ अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून ही योजना मंजूर करण्यात आली आहे.रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे उद्यापासून, द नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक लि., बंगलोर (कर्नाटक) च्या शाखा कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (महाराष्ट्र) च्या शाखा म्हणून काम करणार आहेत.विशेष म्हणजे याआधी कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने दंडात्मक कारवाई केली आहे. या बँकेला ८.३० लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. काही नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या बँकेवर हा दंड ठोठावण्यात आला आहे.