कर्नाटक विजयाचा एक हिरो सुनील कानूगोलू…

बंगरूळू- कॉंग्रेसने कर्नाटकात विजय मिळवून दक्षिणेकडील राज्यात केलेल्या पुनरागमनाचे श्रेय राहुल गांधींपासून, मल्लिकार्जुन खर्गे, कर्नाटक कॉग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांना दिले जात आहे . मात्र या विजयात एक हिरो पडद्यामागेच राहिला आहे . त्याचे नाव सुनील कानुगोलू आहे .
. कर्नाटकमधील कॉंग्रेसच्या विजयासाठी त्याने रणनीती आखली होती. संपूर्ण निवडणुकीदरम्यान त्याने जनतेशी संपर्क बनवून ठेवला. सुनील कानुगोलूने प्रचारासाठी नवनवीन पद्धती शोधून काढल्या आणि जनतेची नस ओळखून विजय मिळवून दिला
. सुनील कानुगोलूने याआधी द्रमुक , अण्णाद्रमुक आणि भाजपसोबत काम केले आहे. सुनील कानुगोलूनेने २०१७ साली उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणूकीत भाजपसाठी काम केले आहे. 2019 च्या संसदीय निवडणुकीत द्रमुक आणि २०२१ च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत अण्णाद्रमुकसाठी निवडणूक रणनीती बनवली होती. सुनील कानुगोलूने माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या अनुपस्थितीत रणनीती आखली आणि चमकदार कामगिरी केली.
2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या निवडणूक प्रचाराचे प्रमुख घटक होते. त्यांनी भाजपच्या असोसिएशन ऑफ बिलियन माइंडस चे प्रमुख म्हणून काम केले आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधील भाजपच्या प्रचारात महत्वाची भूमिका बजावली. या सर्व निवडणूकांमध्ये भाजप जिंकला किंवा निवडणूकीत सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आला.
गेल्या वर्षीच सुनील कानुगोलू कॉंग्रेसशी जोडला गेला आणि देशातल्या सर्वात जुन्या पक्षासाठी रणनीती बनवायला सुरू केली. कन्याकुमारी पासून काश्मिरपर्यंत काढलेल्या राहुल गांधीच्या भारत जोडो य़ात्रेचे श्रेय देखील सुनील कानुगोलूलाच जाते असे सांगतात .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top