मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना सक्तीच्या विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कर्नाटकातील निवडणूक प्रचाराच्या वेळी आलेल्या ताणामुळे फडणवीस आजारी पडले आहेत. त्यानंतर त्यांचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले . प्रकृती अस्वास्थ्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही उपस्थित राहता आले नव्हते. फडणवीस यांनी मुंबईतील सागर बंगल्यावर विश्रांती घेतली. मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा दीड दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या स्वागताला फडणवीस उपस्थित होते.
कर्नाटक निवडणुकीच्या ताणामुळे फडणवीसांची प्रकृती बिघडली
