बंगळुरू- कर्नाटक सरकारने गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना आता सन्मानाने मरण्याचा म्हणजेच इच्छामरणाचा अधिकार दिला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश दिले होते. देशात हा कायदा लागू करणारे कर्नाटक हे पहिले राज्य ठरले असून ज्यांना दीर्घ आजार आहे किंवा ज्यांना हॉस्पिटलमध्ये जीवन रक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले आहे. पण जगण्याची इच्छा नाही, अशा त्रस्त रुग्णांना आता सन्मानाने इच्छामरण स्वीकारण्याचा अधिकार मिळणार आहे.
कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये याची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, रुग्णांना सन्मानाने मरण्याचा अधिकार’ देताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाची अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने ऐतिहासिक आदेश जारी केला आहे. इच्छामरण स्वीकारण्याचा अधिकाराबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती, तेव्हा न्यायालयाने गंभीर आजारी असलेल्या कोणत्याही व्यक्तीने सन्मानाने मृत्यूला सामोरे जावे, याबाबत कायदा लागू करणे योग्य असल्याचे म्हटले होते. तसेच राज्यांना या कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानंतर हा कायदा संपूर्ण कर्नाटकात लागू करण्यात आला आहे.