कर्नाटकात पंतप्रधान मोदींच्या २० सभा

बंगळुरू – पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारात उतरणार असून त्यांच्या कर्नाटकात २० प्रचारसभा होणार आहेत. तसेच काही ठिकाणी त्यांचे रोडशोही होणार आहेत.

१० मे रोजी कर्नाटकात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी यापूर्वीच जाहीर झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता राखण्यासाठी कंबर कसलेल्या भाजपने पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजपशासित सर्व राज्यांमधील स्टार प्रचारक तसेच काही प्रमुख केंद्रीय मंत्री यांना निवडणूक प्रचारात उतरवले आहेत. शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान मोदी कर्नाटकात २० प्रचारसभा तसेच काही ठिकाणी रोडशोही करणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची सध्या प्रदेश भाजपकडून आखणी सुरू असल्याचे समजतेकर्नाटकात पंतप्रधान मोदींच्या २० सभा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top