कर्नाटकात काँग्रेसच्या सरकारसाठी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचे साकडे

सोलापूर- महाराष्ट्रातील एका कार्यकर्ता आई तुळजाभवानीकडे कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेसचे सरकार यावे, यासाठी घातलेले साकडे पूर्ण झाल्याने सोलापूर ते तुळजापूरपर्यंत दंडवत घालत जात आहे. या कार्यकर्त्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेसचे सरकार यावे आणि मुख्यमंत्रीही काँग्रेसचाच व्हावा असे मागणे सोलापूरच्या एका कार्यकर्त्यांने तुळजापूरच्या आई तुळजाभवानीकडे मागितले होते. हे साकडे पूर्ण झाल्याने आता सोलापुरातील अनिल पाटील हा कार्यकर्ता सोलापूरच्या भवानी माता मंदिरापासून तुळजापूरच्या आई तुळजाभवानी माता मंदिरापर्यंत दंडवत घालत जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची
धुरा सांभाळल्यानंतर सुद्धा अनिल पाटील यांनी अशाच प्रकारे सोलापूर ते तुळजापूर दंडवत घातला होता. सोलापूर ते तुळजापूर हे ४६ किलोमीटरचे अंतर आहे.

दरम्यान,येत्या विधानसभेला महाविकास आघाडीने एकत्र येत भाजपाला टक्कर द्यावी आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री व्हावा असेही साकडे अनिल पाटील यांनी आई तुळजाभवानीकडे घातले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री झाला तर पुन्हा एकदा सोलापूर ते तुळजापूर दंडवत घालेन असे साकडे पुन्हा एकदा अनिल पाटील यांनी आई तुळजाभवानीला घातले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top