Home / News / कर्नाटकातील मांड्यामध्ये मिरवणुकीदरम्यान तणाव

कर्नाटकातील मांड्यामध्ये मिरवणुकीदरम्यान तणाव

मांड्या- कर्नाटकातील मांड्या शहरातील नागमंगला भागात गणेश विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीनंतर दोन गटात हाणामारीची घटना घडली. पोलिसांनी काही जणांना अटक...

By: E-Paper Navakal

मांड्या- कर्नाटकातील मांड्या शहरातील नागमंगला भागात गणेश विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीनंतर दोन गटात हाणामारीची घटना घडली. पोलिसांनी काही जणांना अटक केली असून शहरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.

मांड्या शहरातही सध्या गणेशोत्सवाचा उत्साह आहे. काल नागमंडला या भागातून एक गणेशविसर्जनाची मिरवणूक जात होती. या मिरवणुकीवर काही जणांनी दगडफेक केली. त्यानंतर दोन गटात हाणामारी झाली. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. या हाणामारीत काहीजण जखमी झाले. त्यानंतर जमावाने रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांना आगी लावल्या. काही दुकानांना आगीही लावण्यात आल्या. पोलिसांनी शहरात जमावबंदी आदेश लागू केले आहेत. आगीमुळे शहराताली वीजपुरवठाही बंद करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी अनेकांवर हत्येचा प्रयत्न, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या