कर्जत- तालुक्यातील
मोठे वेणगावच्या उत्तरेला
इतिहास अभ्यासक व संशोधक सागर सुर्वे आणि नेत्रा कनोजे यांना अतिशय प्राचीन अशा कातळावर कोरलेली चित्रे आढळून आली आहेत.आता या कोरीव चित्रांवर अधिक संशोधन केले जाणार असल्याची माहिती नेत्रा कनोजे यांनी दिली.
याआधीही अभ्यासक व संशोधक सागर सुर्वे आणि नेत्रा कनोजे यांनी मोठे वेणगावच्या हद्दीतच प्राचीन खेळ मंकाळाचे तब्बल अठरा कोरीव पट शोधून काढले होते.कर्जतला प्राचीन इतिहास आहे.या दोघांनी आता नव्याने संशोधन करताना कातळावरील कोरीव चित्रे शोधून काढली आहेत.प्राथमिक अंदाजानुसार ही बैलाची चित्रे असल्याचे मत सागर सुर्वे यांनी व्यक्त केले. या चित्रांमुळे कर्जतच्या इतिहासात अतिशय मोलाची भर पडली आहे.दरम्यान,सुर्वे यांच्या या संशोधनात मनीष सोनावळे आणि भगवान मुंडे यांची मोलाची मदत मिळाली आहे.