वैभववाडी – तब्बल १४ महिन्यानंतर अखेर करूळ घाटातून सर्वसामान्यांचे प्रवासाचे मुख्य साधन असलेली एस टी बस वाहतूक सुरु झाली आहे. आता एसटी करूळ घाटातून एकेरी मार्गाने धावू लागल्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
करूळ घाटाच्या नूतनीकरणाच्या कामासाठी २२ जानेवारीपासून घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. तब्बल १४ महिन्यांनंतर २४ फेब्रुवारीपासून करूळ घाटातून एकेरी वाहतूक सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात ही वाहतूक सुरू करण्यात आली नव्हती.अखेर एसटी विभागाने काल मंगळवारपासून एसटी बस सुरू करण्याचे आदेश सर्व आगार व्यवस्थापकांना दिले.त्यानुसार मंगळवारी वैभववाडी-करूळ-गगनबावडा अशी एसटी वाहतूक सुरू झाली आहे.तूर्त करूळ घाटातून वैभववाडी-गगनबावडा अशी एकेरी वाहतूक सुरू आहे. तर गगनबावड्याहून येणार्या एसटी बस भुईबावडा घाटातून पूर्वीप्रमाणे येत आहेत.