कराड,साताऱ्यातून महाकुंभ मेळाव्यासाठी विशेष रेल्वे

सातारा – प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यासाठी कराड आणि साताऱ्यातून विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. हुबळी विभागाकडून हुबळी- बनारस- हुबळी अशी विशेष गाडी सुरू करण्याचा निर्णय दक्षिण-पश्चिम रेल्वेने घेतला आहे. शुक्रवार १४ फेब्रुवारी, २१ फेब्रुवारी आणि २८ फेब्रुवारीला ही विशेष रेल्वे मिरजमधून दुपारी १:३५ वाजताच्या सुमारास धावणार आहे.
महाकुंभ मेळाव्यासाठी सुरू करण्यात आलेली ही विशेष रेल्वे दुपारी अडीच वाजता किर्लोस्करवाडी, दुपारी ३ वाजता कराड आणि सातारा येथून दुपारी ४ वाजता निघेल. दुसऱ्या दिवशी रात्री ०८:३० वाजताच्या सुमारास प्रयागराज येथे पोहोचेल. ही रेल्वे प्रयागराज येथून परतीच्या प्रवासासाठी सोमवार १७ फेब्रुवारी, २४ फेब्रुवारी आणि ३ मार्चला सकाळी ०८ :५५ वाजताच्या सुमारास निघेल. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ०७:४० वाजताच्या सुमारास मिरज जंक्शन येथे पोहोचेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top