जयपूर – कपडे वेळेवर शिवले नाहीत म्हणून एका अल्पवयीन मुलाने ६५ वर्षांच्या वयोवृद्ध टेलरची हत्या केली. या घटनेमुळे जयपूर मध्ये खळबळ माजली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर मधील चौमू पक्का येथे सुरजमल प्रजापती या ६५ वर्षीय टेलरचे दुकान आहे.
४ दिवसांपूर्वी एका १४ वर्षीय मुलाने प्रजापती यांच्याकडे कपडे शिवायला दिले होते. यावेळी गुरुवारी कपडे शिवून मिळतील असे त्यांनी सांगितले. त्यानुसार तो अल्पवयीन मुलगा गुरुवारी सकाळी कपडे घ्यायला प्र्जापती यांच्याकडे गेला. पण कपडे शिवून झाले नव्हते . या गोष्टीचा त्या मुलाला इतका राग आला कि त्याने बाजूलाच पडलेल्या लाकडी दांड्याने टेलरवर हल्ला केला आणि त्यांना झोडपून काढले. यात गंभीर जखमी झालेल्या टेलरचा मृत्यू झाला . त्यानंतर आसपासच्या दुकानदारांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले . या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे