कन्नूर : केरळमधील कन्नूर येथील चेलोरा येथील लैंडफिल साइटला रविवारी पहाटे भीषण आग लागली. लैंडफिल येथील जागेवर महापालिकेचा कचरा प्रक्रिया प्रकल्पही आहे. त्यामुळे येथील कचऱ्याचा ढिगाऱ्यातही आग झपाट्याने पसरत असल्याचे पाहिल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी अग्निशमन दल आणि अधिकारी यांना माहिती दिली.अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि अनेक तासांनंतर आग आटोक्यात आणली.
येथील अनेक एकर जागेवर पसरलेल्या ट्रेंचिंग ग्राउंडमध्ये महापालिकेचा कचरा प्रक्रिया प्रकल्पही आहे. त्यामुळे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात असलेल्या प्लस्टिकच्या वस्तू ते इतर सर्व प्रकारचा कचरा आगीत जळून राख झाला. आग झपाट्याने पसरत असल्याचे पाहिल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी अग्निशमन दल आणि अधिकारी यांना माहिती दिली. थलासेरी, मत्तन्नूर आणि इरिती येथील अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि अनेक तासांनंतर आग आटोक्यात आणली गेली. या आगीच्या धुराचे लोट हवेत पसरल्यामुळे नागरिकांना श्वास घेण्यासही त्रास होत होता. महापौर टी.ओ.मोहनन यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र आगीचे कारण स्पष्ट झाले नाही.