Home / देश-विदेश / कन्नड अभिनेत्याच्या कारची दाम्पत्याला धडक! १ ठार

कन्नड अभिनेत्याच्या कारची दाम्पत्याला धडक! १ ठार

बंगळुरू – कन्नड अभिनेता नागभूषणच्या कारने बंगळुरूमध्ये रस्त्यात चालत असलेल्या पती-पत्नीला धडक दिली. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला असून तिच्या पतीवर...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

बंगळुरू – कन्नड अभिनेता नागभूषणच्या कारने बंगळुरूमध्ये रस्त्यात चालत असलेल्या पती-पत्नीला धडक दिली. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला असून तिच्या पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बेंगळुरूमधील कुमारस्वामी वाहतूक पोलिस ठाण्यात या कन्नड अभिनेत्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘तगारू पल्या’ या कन्नड चित्रपटात अभिनय केलेल्या नागभूषण बंगळुरूमध्ये शनिवारी रात्री ९.४५ च्या सुमारास कारने जात होता. यावेळी वसंता पुरा मुख्य रस्त्यावरील फुटपाथवरून चालत असलेल्या जोडप्याला नागभूषण याच्या गाडीने मागून धडक दिली. हे जोडपे उत्तरहल्लीहून कोननकुंटेकडे निघाले होते. या अपघातानंतर नागभूषणने स्वत: या जोडप्याला रुग्णालयात नेले. पण प्रेमा (४८) या महिलेचा रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला. तर तिचा नवरा कृष्णा (५८) याच्या दोन्ही पायांना, डोक्याला आणि पोटाला दुखापत झाली.

Web Title:
संबंधित बातम्या