Home / News / कनौजमध्ये भीषण अपघात! ८ जणांचा मृत्यू ४० जखमी

कनौजमध्ये भीषण अपघात! ८ जणांचा मृत्यू ४० जखमी

कनौज- लखनौ-दिल्ली महामार्गावर कनौज इथे झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाले आहेत. रस्त्यावर उभ्या असलेल्या...

By: E-Paper Navakal


कनौज- लखनौ-दिल्ली महामार्गावर कनौज इथे झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाले आहेत. रस्त्यावर उभ्या असलेल्या एका टँकरला बसने धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहने उलटली. त्यात बसमधील प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.
आगरा-लखनौ एक्सप्रेस वेवर सकरावा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिश्राबाद गावाजवळ हा अपघात झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना सैफई येथील एम्स रुग्णालयात दाखल केले.

Web Title:
संबंधित बातम्या