Home / News / कधी वीजबिल भरलेच नाही! शिंदेंच्या खासदाराचे विधान

कधी वीजबिल भरलेच नाही! शिंदेंच्या खासदाराचे विधान

बुलढाणा- शेतातील पंपाचे वीज बिल आम्ही तीन पिढ्यांपासून भरलेले नाही. डीपी जळाली की इंजिनियरला हजार- दोन हजार रुपये देऊन डीपी...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

बुलढाणा- शेतातील पंपाचे वीज बिल आम्ही तीन पिढ्यांपासून भरलेले नाही. डीपी जळाली की इंजिनियरला हजार- दोन हजार रुपये देऊन डीपी दुरुस्त करून घ्यायची, अशी वीजचोरीची जाहीर कबुली देणारे धक्कादायक विधान शिवसेना शिंदे गटाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच शेतकर्‍यांची वीजबिले माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र या पार्श्वभूमीवर त्यांच्याच पक्षाचे केंद्रीय मंत्री असलेले प्रतापराव जाधव यांनी आपण तीन पिढ्यांपासून वीजबिल भरत नसल्याची जाहीर कबुली दिली आहे.त्यामुळे शिंदे गट अडचणीत येण्याची शक्यता आहे.रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक व केंद्रीय मंत्रिमंडळात निवड झालेल्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि बुलढाणा जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा मलकापुरात जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. या सत्कारात भाषण करताना प्रतापराव जाधव यांनी हे धक्कादायक विधान केले.

Web Title:
संबंधित बातम्या