Home / News / कणकवलीच्या पटवर्धन चौकातील आर.बी. बेकरीसह दुकानांना आग

कणकवलीच्या पटवर्धन चौकातील आर.बी. बेकरीसह दुकानांना आग

कणकवली – कणकवली शहरातील पटवर्धन चौक येथील आर.बी. बेकरीला आज पहाटे आग लागली.या बेकरीतील संपूर्ण फर्निचर आणि सामान जळून खाक...

By: E-Paper Navakal

कणकवली – कणकवली शहरातील पटवर्धन चौक येथील आर.बी. बेकरीला आज पहाटे आग लागली.या बेकरीतील संपूर्ण फर्निचर आणि सामान जळून खाक झाले होते. या बेकरीला लागून असलेल्या राजू गवाणकर यांचे कार्यालय, बर्डे मेडिकल आणि अन्य दुकानांनादेखील आगीची झळ बसली. नगरपंचायतच्या अग्निशामक जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवले.ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज आहे. या घटनेची माहिती मिळताच आमदार नितेश राणे यांनी घटनास्थळी भेट देऊन दुकान मालकांची विचारपूस केली. तुम्ही घाबरून जाऊ नका, मी आपल्या पाठीशी आहे. मी सर्वतोपरी लागणारी मदत करेन. पुढील काळात अशा पद्धतीच्या घटना होऊ नयेत म्हणून काळजी घेतली जाईल, असे आश्वासन नितेश राणे यांनी दिले.

Web Title:
संबंधित बातम्या