कंगनाच्या तक्रारी प्रकरणी जावेद अख्तर यांना समन्स

मुंबई- प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत हिचा अपमान आणि धमकावल्या प्रकरणी काल अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांनी जावेद अख्तर यांना समन्स बजावला आहे. याप्रकरणी न्यायालयाने अख्तर यांना ५ ऑगस्ट रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले. सध्या सर्वत्र जावेद अख्तर आणि कंगना रणौट यांच्यामध्ये असलेल्या वादाची चर्चा सुरू आहे.

२०२१ मध्ये कंगना रणौट हिने जावेद अख्तर यांच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. जावेद अख्तर आपल्याला धमकावत असल्याचा आणि अभिनेता हृतिक रोशनची माफी मागण्यासाठी माझ्यावर दबाव टाकत आहेत, असे कंगनाने अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या निधनानंतर एका मुलाखतीत सांगितले. ज्यामुळे ती चर्चेत आली होती. फक्त कंगना हिनेच नाही तर जावेद अख्तर यांनी देखील कंगनाविरोधात बदनामीप्रकरणी फौजदारी तक्रार नोंदवली होती. आता हे प्रकरण कायद्याच्या कचाटात्यात अडकले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top