ओशिवरा फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग

जोगेश्वरी : जोगेश्वरी पश्चिम जवळील ओशिवरा घास कम्पाऊंडमधील फर्निचर गोडाऊनला सोमवारी सकाळी ११ सुमारास आग आली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी दीड तास शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे लोळ दूरपर्यन्त दिसत असल्याने आगीची दाहकता दिसून येत होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नसल्याचे महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या भीषण आगीमध्ये तब्बल 20 ते 25 फर्निचरची दुकाने जळून खाक झाली आहेत. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Scroll to Top