मुंबई- जोगेश्वरी पश्चिमेकडील ओशिवरा परिसरात आज दुपारी ११.३० वाजताच्या सुमारास फर्निचर मार्केटमध्ये आग लागली. गोदामातील लाकडी वस्तूंमुळे ही आग भडकल्याचे सांगण्यात आले. सुरुवातीला एका गोदामाला लागलेली आग हळूहळू आजुबाजूच्या परिसरात पसरली. त्यानंत या आगीने भीषण रूप धारण केले. या आगीमुळे १० दुकाने जळून खाक झाली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या, स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. त्यानंतर ही आग नियंत्रणात आणली गेली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, आगीमुळे धुराचे मोठे लोट उसळले होते. त्यामुळे आजुबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली.
ओशिवरा परिसरातील फर्निचर मार्केटमध्ये आग
