मुंबई – पश्चिम रेल्वेच्या उपनगरी रेल्वे मार्गावरील दहिसर आणि बोरिवली स्थानकांदरम्यान पॉवर ओव्हरहेड वायर तुटल्याने बुधवारी सकाळी रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या फास्ट लाईनवर १० वाजताच्या दरम्यान ही वायर तुटली. यामुळे लोकल या मार्गावर अडकून पडल्या होत्या. प्रवाशांना रुळावरून चालत स्टेशन गाठावे लागले. तब्बल दोन तासांनी रेल्वे वाहतूक सुरळीत झाली.
पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ओव्हरहेड वायरचा काही भाग तुटल्याने ३ गाड्या खोळंबल्या आणि उर्वरित गाड्या इतर ट्रॅकवर वळवण्यात आल्या. तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतर दोन तासांनी सेवा सुरळीत झाली.