लॉस एंजल्स-अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर दुर्मिळ असलेला ओरफिश मासा मृतावस्थेत आढळला आहे. या मासा नेहमी खोल समुद्रात आढळतो.हा मासा किनाऱ्यावर आढळणे म्हणजे धोक्याचे संकेत असल्याचे मत अनेक तज्ज्ञ व्यक्त करत आहे.विषेशतः जपानमध्ये या माशाचे दिसणे हे अशुभ संकेत मानले जातात.
‘ओरफिश’ मासा मृतावस्थेत आढळणे या घटनेचा जमिनीखाली समुद्रात होणारे मोठे भूकंप व त्सुनामीशी संबध जोडला जातो. हा मृतावस्थेतील मासा कॅलिफोनिर्यातील ऐन्सिनिटीस किनाऱ्यावर आढळून आला आहे.याची लांबी ९ फुटांची आहे.खोल समुद्रातील गेल्या तीन महिन्यातील ही तिसरी घटना आहे.ही घटना दुर्मिळ असून गेल्या शतकात केवळ २२ वेळा असे घडले आहे असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.वैज्ञानिकांच्या मते टेक्टोनिक प्लेटांमधील हालचाली व घर्षणामुळे होणाऱ्या भुकंपात असे जलचर मरण पावतात व तरंगत किनाऱ्यावर येतात. मेसोपेलॅजिक झोन जो समुदात ३००० हजार फुटांपेक्षा अधिक खोलवर असतो अशा ठिकाणी या घटना घडत असतात.यापूर्वी आढळलेला ओरफिश हा १२ फुट लांबीचा होता व तो ऑगस्ट महिन्यात सॅन डियागो जवळच्या समुद्र किनाऱ्यावर आढळला होता.ओरफिशला ‘समुद्री सर्प’ सुद्धा म्हटले जाते. हा चांदीसारखा चकचकीत असून याची लांबी ३० फुटापर्यंत वाढू शकते. हे मासे किनाऱ्यावर मृत सापडणे हे धोक्याचे संकेत असू शकतात असे काही तज्ञांचे मत आहे.