रायगड – म्हसळा तालुक्यातील पाबरे गावाजवळ एका ओढ्यामध्ये तब्बल १३.४ फूट लांब व साधारण २३० किलो वजनाची मगर आढळली.या मगरीला वनविभाग व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी पकडले.
काल सकाळी साधारण साडेदहा वाजण्याच्या सुमारास म्हसळा येथून सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या सदस्यांना वन विभागाचा फोन आला.त्यांनी ओढ्यामध्ये मगर असल्याची माहिती दिली.माहिती मिळताच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे सदस्य एका तासाभरात घटनास्थळी पोहोचले व बचावकार्य सुरू केले. या मगरीचा आकार मोठा असल्याने बचावकार्य करण्यासाठी योग्य नियोजन व खबरदारी घेण्यात आली आणि शितफिने बचाव कार्य करण्यात आले. टीमने अगदी सुखरूपणे त्या मगरीला पकडले. वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली मगरीला तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.